हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे. हे लोक मंदिरात दर्शन घेण्यासाठी येथे पोहोचले असावेत. मांजरीला तिथे प्रदक्षिणा घालताना पाहून सगळेच थक्क झाले, काहींनी त्वरीत व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी MP_Wale (@mp_wallee) नावाच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की, एक मांजर मूर्तीला प्रदक्षिणा घालत आहे. व्हिडिओला दिलेल्या कॅप्शननुसार, हा व्हिडिओ शनी शिंगणापूर मंदिरातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
गेल्या 3 दिवसांपासून हे मांजर वारंवार प्रदक्षिणा घालत असल्याचे सांगण्यात येत आहे. ऐरव्ही मांजर लोकांना पाहून घाबरून लगेच पळून जाते, पण इथं हे मांजर अनेक लोक असतानाही पळत नाही आणि प्रदक्षिणा मारत राहते. मांजर कसलीही भीती न बाळगता प्रदक्षिणा घालत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
@drseemat ने X अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की सर्व भाविक तेथे दर्शनासाठी आले आहेत आणि मांजराची न घाबरता प्रदक्षिणा सुरू आहे. 7 नोव्हेंबर रोजी त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या X अकाउंटवर शेअर केला, आतापर्यंत अनेक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे.
शनि शिंगणापूर मंदिर का प्रसिद्ध आहे?
शिर्डीपासून 65 किलोमीटर अंतरावर शनी शिंगणापूर मंदिर आहे. हे मंदिर शनि ग्रहाशी संबंधित प्रसिद्ध हिंदू देवता शनिदेव यांना समर्पित आहे. शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी स्थानिक लोक आणि देशभरातून लोक येतात. वृत्तानुसार, हे मंदिर सुमारे 1500 वर्षे जुने आहे. शनि शिंगणापूर मंदिर हे देशातील सर्वात मोठे शनि मंदिर असल्याचेही सांगितले जाते.
