शिर्डी, 30 जुलै : मागील काही दिवसांपासून एसटी बसची दूरवस्था दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तीन दिवसांपूर्वी गडचिरोलीतील अहेरी आगारातील बसचं छप्पर तुटलेल्या अवस्थेत धावणाऱ्या बसचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील एका एसटी बसचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात एसटी बसचा चालक एका हाताने स्टिअरिंग आणि दुसर्या हाताने काचेवरील वायपर फिरवत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर आता शिर्डी येथे बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने बस वाळूच्या डेपोवर चढवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
काय आहे घटना?
पंढरपूरहून नाशिकला निघालेल्या बसचे ब्रेक अचानक फेल झाले. अशा परिस्थितीत चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनेक प्रवाशांचा जीव वाचला. काही अंतरावर नदीवरील मोठा पुल होता. वेळीच गाडी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी वाळूच्या डेपोवर चढवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. महामंडळाची बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. ग्रामस्थांनी आपत्कालीन दरवाजातून प्रवाशांना बाहेर काढले. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द गावात ही घटना घडली.
आठवड्याभरात चार घटना समोर
पहिल्या घटनेत 27 जुलैला गडचिरोली जिल्ह्यात एका बसचे छत तुटून वर उडत होते. तरीही या बसचा चालक ही बस वेगाने चालवत होता. या एसटीच्या पुढे असणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ काढला आहे. दुसऱ्या घटनेत (28 जुलै) नांदेड जिल्ह्यातील देगलूर मुक्रमाबाद जाणाऱ्या बसचा पत्रा पावसाच्या पाण्यामुळे गळत होता. यामुळे एसटी बसमध्ये पाणीच पाणी झाले. अशावेळी प्रवाशांना छत्री घेऊन प्रवास करावा लागला. दरम्यान, यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
तिसरी घटना पुन्ही गडचिरोली जिल्ह्यातून समोर आली होती. पावसाच्या पाण्यामुळे पूर आल्याने अडकलेल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी निघालेल्या बसचा वायपर बंद पडला. त्यामुळे बस चालकाला एका हाताने स्टिअरिंग आणि दुसर्या हाताने वायपर चालवण्याची वेळ आली.
वाचा - मोबाईलच्या दुकानाचे शटर उचकटून दोघेजण आत घुसले, CCTV दिसला अन्..
तर आज (30 जुलै) रोजी नांदेड जिल्ह्यातून एक व्हिडीओ समोर आला. ज्यात एसटी बसेसचे वायपर काम करत नसल्याने ड्रायव्हर हाताने काच साफ करत एसटी चालवत आहे. तर एका हाताने स्टिअरिंग आणि दुसर्या हाताने वायपर फिरवणाऱ्या या बस चालकाचा देखील व्हिडीओ व्हायरल होत आहे.
