मालेगाव, धुळे, संभाजीनगर आणि नांदेड-वाघाळा या चार महापालिकांमध्ये एमआयएम पक्षाने मोठ्या विरोधी पक्षाची भूमिका मिळवत दमदार उपस्थिती नोंदवली आहे. विशेषतः मुस्लीमबहुल भागांमध्ये एमआयएमच्या कामगिरीने सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष वेधले आहे.
मालेगावात गणित काय आहे?
मालेगाव महापालिकेत एकूण 84 जागांपैकी इस्लाम पक्षाने 35 तर एमआयएमने 26 जागा जिंकल्या आहेत. भाजपला केवळ 2 , काँग्रेसला 3 तर शिवसेना शिंदे गटाला 18 जागांवर समाधान मानावे लागले. या निकालात एमआयएमने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरत मजबूत विरोधी पक्षाची भूमिका मिळवली आहे.
advertisement
धुळ्यात काय गणित आहे?
धुळे महापालिकेत भाजपने 50 जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली असली, तरी एमआयएमने 10 जागा जिंकत महत्त्वपूर्ण उपस्थिती दाखवली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 8, शिवसेना शिंदे गटाला ५ तर इतरांना 1 जागा मिळाली. येथेही एमआयएम विरोधी राजकारणात निर्णायक ठरत आहे.
छत्रपती संभाजीनगमध्ये काय गणित आहे?
संभाजीनगर महापालिकेत एकूण 115 जागांपैकी भाजप 57 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र एमआयएमने तब्बल 33 जागा जिंकून प्रमुख विरोधी पक्षाचा मान मिळवला आहे. शिवसेना शिंदे गटाला 13, शिवसेना ठाकरे गटाला 6, काँग्रेसला 1, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 तर इतरांना 4 जागा मिळाल्या आहेत.
नांदेडमध्ये काय गणित आहे?
नांदेड-वाघाळा महापालिकेत भाजपने 45 जागांसह वर्चस्व राखले आहे. काँग्रेसला 10, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2, शिवसेना शिंदे गटाला 4 जागा मिळाल्या असताना एमआयएमने 14 जागा जिंकून प्रभावी विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे.
मुस्लीमबहुल भागांमध्ये एमआयएमची मजबूत पकड
या चारही महापालिकांच्या निकालांवरून राज्यातील अनेक मुस्लीमबहुल भागांमध्ये एमआयएमने आपली पकड अधिक मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचे संकेत मानले जात आहेत.
हे ही वाचा :
