टाटा मेमोरियल रूग्णालयात नोकरीची संधी, थेट मुलाखतीतून होणार निवड प्रक्रिया
सोलापूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर पूर्ण होणार आहे. सोलापूर- मुंबई विमान सेवा सोलापूरकरांच्या सेवेमध्ये 15 ऑक्टोबरपासून येणार आहे. सोलापूर- मुंबई विमान सेवेसोबतच सोलापूर- बंगळूरू विमान सेवा सुद्धा सुरू होणार आहे. बहुप्रतीक्षित विमानसेवेबद्दलची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या फेसबूक पोस्टच्या माध्यमातून सोलापूरकरांना दिली आहे. 15 ऑक्टोबरपासून दुपारी 12:55 मिनिटांनी सोलापूर- मुंबई आणि दुपारी 02:45 मिनिटांनी मुंबई- सोलापूर विमानसेवेला सुरूवात होणार आहे.
advertisement
पाठदुखीची चिंता सोडा, हे घरगुती उपाय करा, लगेच मिळेल आराम
तर सकाळी 11:10 मिनिटांनी बंगळूरू- सोलापूर आणि दुपारी 04:15 मिनिटांनी सोलापूर-बंगळूरू विमानसेवेला सुरूवात होणार आहे. या दोन्ही शहरातल्या विमानसेवेच्या प्री- तिकिट बुकिंगसाठी 20 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोलापूर-गोवा विमानसेवा सुरु झालीय, ज्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यानंतर आता मुंबई आणि बंगळूरूसाठी देखील विमानसेवा सुरु होत असल्याने सोलापूरकरामध्ये आनंद निर्माण झाला आहे. सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींची दीर्घकाळापासून प्रलिंबित राहिलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे.