असाच प्रकार आता चाकणमध्ये देखील घडला. चाकणमधील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी मध्ये ओरडून प्रश्न विचारणाऱ्याला झापलं आहे. 'तुलाच फार कळतं आम्ही बिनअकलीचे आहोत, अशा शब्दांत अजित पवारांनी संताप व्यक्त केला. तसेच आपण चाकण परिसरातील विकास कामांसाठी कालच जवळपास ३०० -४०० कोटींची कामं मंजूर केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
नेमकं काय घडलं?
advertisement
अजित पवारांनी आज सकाळी चाकण परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली. यानंतर एका कार्यक्रमात ते स्थानिकांशी संवाद साधत होते. यावेळी भाषण सुरू असतानाच एका तरुणाने "दादा, पाच वेळा आंदोलन केलंय, जीव गेलाय सगळ्यांचा" असं म्हटलं. यावर अजित पवारांनी "होय... होय... साहेब तेवढंच केलंय. आता तेवढंच टीव्हीवर येईन, बाकी काही येणार नाही, असं म्हटलं.
यावर संबंधित तरुणाने पुन्हा "किती दिवसात काम करणार?" असा प्रश्न विचारला. यानंतर अजित पवारांचा पारा चढला. मी आलोच नसतो, तर काय केलं असतं? असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी विचारला. यावेळी अजित पवार म्हणाले, "तुलाच फार अक्कल आहे आणि आम्ही बिनअकली आहोत, असं समजू नको. मी नसतो आलो, तर काय झालं असतं. काल तिथे (बीड) साडेचारला उठून कामं केली, आज इथं साडेचारला आलो. सगळं तुलाच कळतंय का? आणि आम्ही बिनडोक आहे. या दीड शहाण्याला माहीत नाही, काल मी या परिसरातील जवळपास ३००-४०० कोटींची कामं मंजूर केली आहेत."