माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात बसून रमी खेळतानाची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवदेन देण्यासाठी गेलेले छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि इतरांनी मारहाण केली. त्यानंतर राज्यात संताप उसळल्यानंतर चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आला.
अजितदादांचा फोन?
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली. त्यानंतर आज माणिकराव कोकाटे आज माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
कोकाटेंची आज पत्रकार परिषद...
आज मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सिन्नर येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत काही निर्णय जाहीर करतात की आपल्यावरील आरोपाच्या अनुषंगाने पु्न्हा स्पष्टीकरण देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी कृषिमंत्र्यांचे कान टोचले
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात बसून रमी खेळतानाची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत कृषिमंत्र्यांचे वर्तन सरकारला भूषणावह नाही, असे म्हटले.
विधान भवनात ज्यावेळी चर्चा चालते त्यावेळी कामजाकात अतिशय गांभीर्याने सहभागी होणे अपेक्षित असते. तसेच जरी आपल्या विभागाचे कामकाज नसले तरीही गांभीर्याने ऐकणे गरजेचे असते. एखादवेळी आपण कागदपत्रे वगैरे चाळू शकतो. पण सभागृहात बसून रमी खेळणे हे सरकारला अजिबात भूषणावह नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.