अमोल मिटकरी माध्यमांशी बोलत होते. यावेळी सुरेश धस यांनी यूटर्न घेतल्यावर अमोल मिटकरी यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं धसांनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं, नंतर त्यांनी राजीनामा मागितला नाही, अशी दुटप्पी भूमिका धस यांची असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. आता अजूनही त्यांनी आरोप प्रत्यारोप सुरूच ठेवले तर आम्हाला नाईलाजाने सर्व गोष्टी बाहेर काढाव्या लागतील असा इशाराही मिटकरी यांनी धस यांना दिला. त्यामुळे आता धस बॅकफूटवर का आले हे त्यांनाच विचारा? असा सल्लाही मिटकरी यांनी माध्यमांना दिला आहे.
advertisement
संतोष देशमुख यांच्या हत्तेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी, त्यांचा खटला फास्ट्र ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. धस मुख्यमंत्री यांनाही भेटले अजितदादाना भेटले, हा त्यांचा प्रश्न आहे, पण महायुतीत असताना महायुतीचे भान ठेवावे. ते आमच्यावरही टीका करतात, पण कोणाकडे बोट दाखवताना त्यांनी भान ठेवावे. कोणाकडे बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे असतात असा टोला मिटकरींनी यांनी धसांना लगावला आहे.
