मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संजय खोडके हे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आज शनिवारी अमरावती शहरात कार्यकर्त्यांच्या बैठकीला आपल्या स्कुटरवरून जात होते. त्यावेळी रस्त्यावर अचानक एक कार समोर आली. त्यामुळे आमदार संजय खोडके हे कारला धडकले.
कारच्या धडकेत आमदार संजय खोडके हे काही अंतर फेकले गेले होते. या अपघातात खोडके जखमी झाले आहे. त्यांना तातडीने रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला मार लागल्याने त्यांना उपचारासाठी रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. खोडके यांच्या अपघाताचा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
advertisement
माझी प्रकृती ठीक आहे काळजी करू नये- संजय खोडके यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे सदस्य संजय खोडके यांचा आज शहरात शनिवारी अपघात झाला. चार चाकी वाहनाने संजय खोडके यांना जोरदार धडक दिली. या धडकेत संजय घोडके यांच्या कमरेला दुखापत झाली आहे. त्यांना अमरावतीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. 'कार्यकर्त्यांनी माझ्या प्रकृतीची चिंता करू नये, माझी प्रकृती ठीक आहे. उद्या अमरावतीत होऊ घातलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा यशस्वी करावा' असं देखील आवाहन संजय खोडके यांनी केलं आहे.
