29 वर्षांच्या पिंकीला मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचं होतं, पण वडिलांच्या इच्छेमुळे तिने वैमानिक क्षेत्रामध्ये करिअर करायचं ठरवलं. पिंकी माळीला विमान उड्डाण क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव होता. व्हीसीआर कंपनीमध्ये पिंकी वर्षभरापासून काम करत होती, त्याआधी पिंकीला सांताक्रुझ विमानतळावर कामाचा अनुभव होता. दोनच वर्षांपूर्वी पिंकीचं लग्न झालं होतं.
काय म्हणाली पिंकीची आई?
advertisement
'माझी तब्येत काही दिवसांपासून खराब होती, त्यामुळे वेळेवर गोळ्या घे, टेन्शन घेऊ नको. मी आहे, असं ती मला सांगायची. तिने अजित पवारांसोबत अनेकदा प्रवास केला. काल संध्याकाळीच आमचा फोन झाला होता. तिला कोर्स करायचा होता, त्यासंदर्भात बोलणं झालं. तिला जयपूरमध्ये ग्रॅज्युएशन करायचं होतं. एक लाख रुपये खर्च येणार होता, मी सगळं ऍडजस्ट करेन, असं ती म्हणायची', असं पिंकीची आई म्हणाली आहे.
'रोज सकाळी फोन करायची, जर बोलणं शक्य नसेल तर सांगायची, मम्मी फोन नको करू, मी कामावर जाते. मी सकाळपासून फोन करत होते, पण पिंकीने फोन उचलला नाही. तिचा काहीही रिप्लाय आला नाही, तेव्हाच मी सगळं काही समजून गेले', असं पिंकीच्या आईने सांगितलं.
