TRENDING:

"बायकोला विचारतो, काय ग कुठे गेली...", भर पत्रकार परिषदेत अजित पवारांचं मिश्कील विधान

Last Updated:

अजित पवारांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी नुकतंच RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकीला हजेरी लावली. यावरून अजित पवारांनी मिश्किल विधान केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या शाब्दिक चकमक सुरू आहे. आता पुन्हा एकदा रोहित पवारांनी आपले काका अजित पवारांना डिवचलं आहे. अजित पवारांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी नुकतंच RSS अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकीला हजेरी लावली. या उपस्थितीवरून अजित पवार आणि रोहित पवार पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत.
News18
News18
advertisement

भाजपच्या लोकसभा खासदार कंगना राणौत यांच्या निवासस्थानी दिल्लीत नुकतीच राष्ट्रसेविका समितीची बैठक पार पडली. या बैठकीला सुनेत्रा पवारांनी हजेरी लावली होती. याबाबतचे फोटो राणौत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत. ज्यात सुनेत्रा पवार या बैठकीत उभ्या असल्याचं दिसत आहे. त्यांच्या हातात माईक देखील असल्याचं दिसून येत आहे. शिवाय स्टेजवर बाजुला भारतमातेच्या फोटोसह आरएसएसचे संस्थापक केशव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांचे फोटो दिसत आहेत. राष्ट्रसेविका समिती ही संघ परिवारातील महिलांसाठी काम करणारी संघटना आहे.

advertisement

संघाच्या कार्यक्रमाला अशाप्रकारे सुनेत्रा पवार उपस्थित राहिल्याने रोहित पवारांनी अजित पवारांवर टीका केली. एकीकडे शिव शाहू फुले आंबेडकरांचं आणि यशवंतराव चव्हाणांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे संघाच्या बैठकीला जायचं. ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका रोहित पवारांनी केली. यावर अजित पवारांनी मिश्कील टोलेबाजी केली आहे.

अजित पवारांचं मिश्कील विधान

सुनेत्रा पवार यांनी संघाच्या बैठकीला लावलेल्या उपस्थितीबद्दल विचारलं असता अजित पवार यांनी मिश्कीलपणे आपल्याला याबाबत काहीच माहीत नसल्याचं म्हटलं आहे. "मला याबाबत काहीच माहीत नाही. मी विचारतो. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते. मला माहीत नसतं. मी आताच विचारतो, काय ग कुठे गेली होतीस?" असं मिश्कील उत्तर अजित पवारांनी दिलं.

advertisement

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

सुनेत्रा पवार यांच्या संघाच्या बैठकीला उपस्थित राहण्यावरून रोहित पवार म्हणाले, "मला वाटतं की अजित पवार सत्तेत गेलेत, त्याची वेगळी कारणं आहेत. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांचे विचार स्विकारले नसतील, त्यामुळे त्यांच्यावर कुठेतरी दबाव असेल. एखाद्या बैठकीला या. एखादा फोटो येऊ द्या. यामुळे कुठेतरी संदेश जातो, हे सुद्धा आरएसएसचा विचार आता स्विकारायला लागले आहेत. एका बाजुला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता, शिव शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असाल आणि दुसऱ्या बाजुला तुम्ही आरएसएसच्या बैठकीला जात असाल, किंवा तुमचे प्रतिनिधी जात असतील, तर ही दुटप्पी भूमिका आहे. आज या राजकारणात लोकांना दुटप्पी भूमिका नकोय."

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"बायकोला विचारतो, काय ग कुठे गेली...", भर पत्रकार परिषदेत अजित पवारांचं मिश्कील विधान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल