पडळकरांच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार म्हणाले की, "गोपीचंद पडळकर यांनी काय विधान केलं, याची माहिती सध्या तरी माझ्याकडे नाही. पण मी याच विचाराचा आहे कोणी कोणत्याही राजकीय विचाराचा असला तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे. एक संस्कृती आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करु नये. अशा प्रकारचे वक्तव्य हे वेदना देणारे असते."
advertisement
"आमचं महायुतीचं सरकार आहे. भाजपच्या वेगवेगळ्या लोक प्रतिनिधींचं किंवा त्यांच्याशी संबंधित नेत्याच्या काही चुका होत असतील, तर त्याची भाजपनं नोंद घेतली पाहिजे," असंही अजित पवार म्हणाले.
"वादग्रस्त विधानांसंदर्भात आमच्या महायुती सरकारचं एकमेव धोरण आहे. महायुती तीनही पक्षातील ज्या लोकांनी ते विधान केलं आहे त्या त्या पक्षांच्या नेत्यांनी त्या त्या विधानसंदर्भात नोंद घेतली पाहिजे आणि भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं आमचं धोरण आहे. शिवसेनेसंदर्भात जर काही वादग्रस्त विधान झाले तर एकनाथ शिंदे बोलतील, आमच्या पक्षाकडून जर काही विधान झालं त्याची जबाबदारी माझी आहे आणि भाजपच्या संदर्भात ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे", अशा शब्दात अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
