काजीखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील ही घटना. प्रमोद सरदार असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे. शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक छळ केला आहे. हा शिक्षक गेल्या चार महिन्यांपासून शाळेतील या मुलींचा छळ करत होता. 8 वीच्या विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवून वाईट स्पर्श करत होता. त्याच प्रमाणे त्यांच्याशी अश्लील गप्पा ही मारायचा.
अखेर पीडित विद्यार्थिनींनी याबाबत पालकांसमोर वाचा फोडली आणि यानंतर शिक्षक प्रमोदचे विकृत कृत्य उघडकीस आलं. पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. या संताप जनक घटनेचे माहिती मिळताच उरळ पोलिसांनी कोणत्याही क्षणाची वाट न पाहता तत्काळ आरोपी शिक्षकाला अटक केली. आरोपी शिक्षक प्रमोद सरदार विरुद्ध पॉस्कोसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आज या शिक्षकाला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
advertisement
याप्रकरणी माजी महिला आयोग समितीच्या सदस्य आशा मिरगे यांनी थेट पोलीस आणि पालकमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहे. सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवर वचक राहिला नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर आरोपी शिक्षकासह या शाळेतील कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांवर पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळायला सुरुवात झालीय आणि त्यामुळे आता अकोल्यातील राजकारण सुद्धा पेटण्याची चिन्हे आहेत.