अकोल्यात देखील भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 1.37 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. 4.2 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले. या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मेळघाटात भूकंपाच्या धक्क्याने भूस्खलन देखील झाल्याचे समोर आले आहे. भूकंपाच्या धक्क्याने पहाडाची दरड एसटी बसवर कोसळली. त्याचे काही फोटो समोर आले आहेत.
advertisement
चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, चूर्णी, पाचडोंगरी, जारीदासह आणखी काही गावात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे. संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. तसेत पर्यटकही देखील भीतीच्या छायेत आहेत.
advertisement
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. चिखलदरा शहरासह तालुक्यातही भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचे नागरिकांनी सांगितले.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
September 30, 2024 4:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
विदर्भाचे नंदनवन चिखलदऱ्यात भूकंप, पर्यटक भीतीच्या छायेत, भूकंपाच्या धक्क्याने एसटीवर दरड कोसळली
