TRENDING:

Amravati : शिवसेनेच्या दोन जिल्हा प्रमुखांमध्ये वाद, एकावर गोळीबाराच्या घटनेनं खळबळ

Last Updated:

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर गोळीबार झाला. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संजय शेंडे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

अमरावती : अमरावतीत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या गाडीवर गोळीबाराची घटना घडली आहे. गाडीवर गोळीबाराच्या या घटनेने मोठी खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर गोळीबार झाला. या गोळीबारानंतर अमरावतीत वलगाव पोलीस स्टेशनचे फॉरेन्सिक पथक दाखल झाले आहे. ज्या गाडीवर गोळीबार झाला त्या गाडीची तपासणी केली जात आहे.

advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे अमरावती जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांनी पोलिसात गोळीबार प्रकरणी तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पक्षांतर्गत व पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादावरून हा प्रकार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. शिंदे गटाचे गोपाल अरबट यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरून माझ्या गाडीवर गोळीबार झाला अशी तक्रार गोपाल अरबट यांनी पोलिसात केली आहे.

advertisement

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख असलेल्या गोपाल अरबट यांचा ताफा अमरावतीहून दर्यापूरला जात होता. तेव्हा त्यांच्या गाडीवर गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र या गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा गाडीवर तीन राऊंड फायर करण्यात आले. वलगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गोपाल अरबट यांनी तक्रार दिलीय. गेल्या काही दिवसांपासून दोन जिल्हा प्रमुखांमध्ये वाद सुरू आहे. याच वादातून गोळीबार झाल्याचं म्हटलं जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Amravati : शिवसेनेच्या दोन जिल्हा प्रमुखांमध्ये वाद, एकावर गोळीबाराच्या घटनेनं खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल