TRENDING:

Amravati Loksabha : फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर आणखी एका नेत्याचा राजीनामा! भाजपमध्ये खळबळ

Last Updated:

Amravati Lok Sabha Election Result 2024 : लोकसभेत महाराष्ट्रात मोठा फटका बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. यानंतर भाजपला आता दुसरा फटका बसला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती, (संजय शेंडे, प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यात मोठा फटका बसला आहे. भाजपला केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. या पराभवानंतर उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पराभवाची जबाबदारी स्वीकारली. आपल्याला पदातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. फडणवीस यांच्या निर्णयानंतर महायुतीत खळबळ उडाली आहे. अशात आणखी एका पदाधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
advertisement

माजी विधान परिषद आमदाराचा राजीनामा

अमरावती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष माजी मंत्री विधान परिषदेचे सदस्य प्रवीण पोटे यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाल्याने पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याचं प्रवीण पोटे यांनी स्पष्ट केलं आहे. प्रवीण पोटे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. प्रवीण पोटे यांनी राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

advertisement

अमरावतीत नवनीत राणा यांना पराभवाचा धक्का

लोकसभा निवडणुकीत अमरावतीत भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला. दोघांमध्ये अटीतटीची लढत होती. पण शेवटी बळवंत वानखेडे यांनी बाजी मारली. अमरावतीत दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं होतं. बळवंत वानखेडे यांना 4 लाख 54 हजार 694 मते मिळाली आहेत. तर नवनीत राणा यांना 4 लाख 39 हजार 127 मते मिळालीत. नवनीत राणा या 15 हजार 567 मतांनी पिछाडीवर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रहारच्या दिनेश बुब यांना 72 हजार 699 मते मिळाली.

advertisement

वाचा - फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत; भाजपमधला वाद चव्हाट्यावर, नेत्याचा वरिष्ठांवर निशाणा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांना हरवलं होतं. तेव्हा त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. निवडणूक प्रचारावेळी नवनीत राणा यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसींवर जोरदार टीका केली होती. फक्त 15 सेकंदासाठी पोलीस हटवा आम्ही काय करू शकतो ते दाखवतो अशी इशारावजा धमकीच नवनीत राणा यांनी दिली होती.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Amravati Loksabha : फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर आणखी एका नेत्याचा राजीनामा! भाजपमध्ये खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल