अमरावती - सुट्टीच्या दिवशी फिरायला जाण्यासाठी बेस्ट ऑप्शन शोधत आहात? तर मग आज आम्ही तुम्हाला अमरावती जिल्ह्यातील एक बेस्ट पर्यटनस्थळ सांगणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील गव्हाणकुंड हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट असू शकते. गव्हाणकुंड या तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाविषयी आपण जाणून घेऊयात.
अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात गव्हाणकुंड हे पर्यटन स्थळ आहे. अमरावतीपासून हे ठिकाण 95 किलोमीटर अंतरावर आहे. तर वरूडपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी पुरातन शिव मंदिर कपिलेश्वर देवस्थान आहे. त्याचबरोबर भुयार सुद्धा आहे. या भुयारामध्ये भगवान शंकराची मूर्ती आहे.
advertisement
तेथील नागरिक सांगतात की, येथील गुहा ही सालबर्डी येथे निघालेली आहे. काही वर्षांपूर्वी त्यात बकरी सोडली होती. ती बकरी सालबर्डी येथील भूयारमध्ये निघाली. त्याचबरोबर येथील धबधबा हा सर्वात आकर्षक आहे. या धबधब्यामध्ये 7 कुंड आहेत, असे येथील नागरिक सांगतात.
Sindhudurg News : परतीच्या पावसाचा भातशेतीला मोठा फटका, पिकं जमिनीदोस्त; डोळ्यात अश्रू आणणारी दृश्य
गव्हाणकुंड येथून 2 किलोमीटर अंतरावर 1 गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये जाण्यासाठी तिकिटाचे 20 रुपये द्यावे लागतात. सुट्टीच्या दिवशी एन्जॉय आणि आराम करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. या गार्डनमध्ये विविध प्रकारची फुलझाडे आहेत.
याठिकाणी खेळण्यासाठी मोकळी जागा आहे. जिकडे तिकडे हिरवेगार वातावरण आणि झरे हे दृश्य मनाला भावणारे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत तिथे वेळ घालवू शकता. नैसर्गिक सौंदर्यांसोबत उत्तम फोटोग्राफीही येथे तुम्हाला करता येऊ शकते.