शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. तेव्हापासून बच्चू कडू हे महायुतीत आहेत. मात्र महायुतीत बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी बच्चू कडू यांना फोन केला. यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधला. बच्चू कडू लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचंही म्हटलं जात आहे. या भेटीत त्यांच्या मागण्यांवर आणि प्रश्नांवर चर्चा होणार असल्याची माहिती समजते.
advertisement
अमरावतीत महायुतीची समन्वय बैठक होत आहे. त्या बैठकीलासुद्धा आमदार बच्चू कडू उपस्थित राहणार नसल्याची माहिती समजते. मुंबईत बच्चू कडू हे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे ते अमरावतीतील महायुतीच्या बैठकीला हजर राहणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
शरद पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले होते बच्चू कडू?
मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतल्यानतंर बच्चू कडू म्हणाले होते की, आमची भेट आधीच ठरली होती. काही मुद्द्यावर चर्चा करायची आहे. शेतकरी , मजुरांचे प्रश्न महत्वाचे आहेत. अंपगाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला एक संप्टेंबर पर्यत वेळ दिली आहे. त्यानंतर मी माझा पुढचा निर्णय घेईल. याच मुद्द्यांवर शरद पवार यांची भेट घेतली.
