TRENDING:

काँग्रेस आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर, नाना पटोलेंवर गंभीर आरोप तर अजितदादांचं केलं कौतुक

Last Updated:

अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असून त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संजय शेंडे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

अमरावती : गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झालेल्या अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके या अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सुलभा खोडके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत सुलभा खोडके यांनी भाजपच्या सुनील देशमुख यांचा पराभव केला होता.

अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सुलभा खोडके यांनी म्हटलं की, मी पाच वर्षे काँग्रेसचे आमदार आहे , विरोधी पक्षाची आमदार असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला विकास कामासाठी भरीव मदत केली. त्यामुळे ते 13 तारखेला अमरावती असल्याने त्यांचा सत्कार मी करत आहे.

advertisement

मला काँग्रेस मध्ये सातत्याने डावललं गेलं. मला काँग्रेसच्या बैठकीत बोलावलं जात नाही. मी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माझे फोन घेतले नाही. त्यांनी मला उत्तर दिलं नाही. तसेच जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी दुसऱ्या पक्षातून नेते आल्यामुळे(माजी मंत्री सुनील देशमुख यांचे नाव न घेता) रोज मला डावलत होते असाही आरोप सुलभा खोडके यांनी केला.

advertisement

जो मला तिकीट देईल मी त्यांच्या सोबत लढणार,सध्या मी काँग्रेसमध्येच आहे असा दावा काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांनी केला. सुलभा खोडके यांच्यावर क्रॉस वोटिंगचा आरोप असून त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्ष प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्यापूर्वी त्यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया देत आपलं म्हणणं मांडलं. काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी शहरात अजित पवारांच्या स्वागताचे मोठे होर्डिंग बॅनर लावलेले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झालं. यात काही काँग्रेस आमदारांकडून पक्षाचे आदेश डावलल्याचा आरोप होता. त्यात सुलभा खोडके यांच्याही नावाची चर्चा होती. काँग्रेसकडून क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांना विधानसभा उमेदवारी न देण्याचा निर्णयही घेतला गेल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळेच सुलभा खोडके या काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
काँग्रेस आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर, नाना पटोलेंवर गंभीर आरोप तर अजितदादांचं केलं कौतुक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल