संभाजी भिडे यांच्याविरोधात महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर भिडे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी हालचालीला सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अमरावती शहरातील प्रसिद्ध वकिलांची भेट घेतली आहे. वकिलांची भेट घेऊन अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात अटपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
काँग्रेस आक्रमक
संभाजी भिडे यांनी अमरावतीमध्ये महात्मा गांधी यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वक्तव्यानंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून, राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे आता भिडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
