TRENDING:

रवी राणांना वक्तव्य भोवलं, महायुतीने दाखवला इंगा; अमरावतीतून मोठी बातमी

Last Updated:

विधानसभेच्या निमित्ताने आयोजित महायुतीच्या बैठकीला न बोलावल्यानं रवी राणा यांना डावललं असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संजय शेंडे (प्रतिनिधी)
News18
News18
advertisement

अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला असून पक्षांकडून आढावा बैठका राज्यभरात घेतल्या जात आहेत. अमरावतीत महायुतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या बैठकीला महायुतीचा घटक पक्षाचे आमदार असलेल्या रवी राणा यांनाच आमंत्रित करण्यात आलेलं नाही. अमरावतीत लोकसभेला रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना भाजपने तिकिट दिलं होतं. मात्र नवनीत राणा यांना पराभवाचा धक्का बसला होता. दरम्यान, विधानसभेच्या निमित्ताने आयोजित महायुतीच्या बैठकीला न बोलावल्यानं रवी राणा यांना डावललं असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

advertisement

रवी राणा यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की,  आज अमरावती येथे होत असलेल्या महायुतीच्या बैठकीच मला निमंत्रण नाही. मला आता निमंत्रण आलं तर मी नक्की जाईल. पण मला अजून पर्यंत निमंत्रण आलं नाही. ज्या ज्या बैठकीला मला महायुती चे निमंत्रण आलं त्या बैठकीला मी गेलेलो आहे. अमरावती मध्ये माहिती बैठक आहे ते मला माहित नाही ते तुमच्या माध्यमातून मला कळलं.

advertisement

Cabinet Meeting : विधानसभेआधी विदर्भ, मराठवाड्याला गिफ्ट; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

आमदार रवी राणा हे महायुतीचे घटक पक्ष आहेत. मात्र असं असताना अमरावती होणाऱ्या महायुतीच्या बैठकीत रवी राणा का डावलले गेलं असा प्रश्न उपस्थित होत आहे.  आमदार रवी राना यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी भाजपच्या उमेदवारीवर अमरावती लोकसभेची जागा लढवली मात्र त्या पराभूत झाल्या. नुकतंच रवी राणा यांनी महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात नाराजीही व्यक्त केली गेली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

रवी राणा म्हणाले होते की, आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयेचे 3 हजार करू. या निवडणुकीत त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा. जर मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेईल. रवी राणांच्या या विधानाने खळबळ उडाली होती. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी यावरून रवी राणांवर जोरदा टीका करताना म्हटलं की, राणा दाम्पत्य ब्लॅकमेलर असून ते विधान गंमतीने केलेलं नव्हतं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
रवी राणांना वक्तव्य भोवलं, महायुतीने दाखवला इंगा; अमरावतीतून मोठी बातमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल