काय आहे प्रकरण?
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरातील शिवाजीनगर येथे आई आपल्या दोन मुलांसह (कापसे कुटुंब) राहत होते. पती नसल्याने संसाराचा गाडा नीलिमा कापसे यांच्यावर होता. नीलिमा कापसे या शासकीय कार्यालयात काम करून घर चालवायत होत्या. संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना, नीलिमा कापसे यांचा मुलगा सौरभला आपल्या आईचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. सौरभने कटकारस्थान रचून आपल्या आई आणि भावाला संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने नवीन शक्कल लढवली. आधी खाण्याच्या भाजीमध्ये धोत्र्याच्या बिया टाकल्या. ज्याने आई आणि भावाची प्रकृती खालावली. त्यानंतर दोघांनाही घरी आणून सलाईन लावली. या सलाईनमध्ये गुंगीधारक आणि झोपेचे औषध इंजेक्शनने सलाईनमध्ये सोडले.
advertisement
औषधांच्या अतिडोसमुळे दोघांचाही झोपेतच मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यू झाल्याची खात्री केल्यानंतर त्याने दोघांचे मृतदेह प्लास्टिकमध्ये बांधून दिवाणमध्ये टाकले. घराला बाहेरून कुलूप लावून तो घर सोडून निघून गेला. आठ दिवसानंतर दुर्गंधी पसरत असल्याने पोलिसांच्या मदतीने घर उघडण्यात आले. त्यावेळी ही घटना उघडकीस आली.
वाचा - श्रीमंत तरुणी आणि 8 वर्षांपेक्षा लहान प्रियकर, प्रेमात धोका मिळाला, घडलं भयंकर
पोलिसांची चक्र फिरवली आणि यात पोटच्या गोळ्यानेच घात केल्याचा संशय पोलिसांना आला. अखेर दोघांच्या मृत्यूनंतर सौरभचा मोबाईल बंद असल्याने सौरभ पोलिसांच्या संशयावर होता. पोलिसांनी सौरभला हैदराबादवरून ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली असता हा संपूर्ण प्रकार उघड झाला. पोलिसांनी सौरभ कापसेविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला असून मोर्शी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. सध्या या प्रकरणाची कसून चौकशी पोलीस करताहेत.