TRENDING:

शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्याकडून धमकी, जिवीताला धोका; बच्चू कडूंच्या पत्राने खळबळ

Last Updated:

बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहिलेलं पत्र समोर आलं आहे.  यात धमकी देणाऱ्याने मी शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचं सांगितल्याचा दावा केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : आमदार बच्चू कडू यांनी आपल्या जिवीताला धोका असल्याची तक्रार पोलिसात दाखल केलीय. बच्चू कडू यांनी पत्राद्वारे पोलिसांना ही माहिती दिली असून आपल्याबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलंय. आमदार बच्चू कडू यांनी यासंदर्भात जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे. माझा अपघात झाला म्हणून चौकशीसाठी नागरिकांचे फोन येतायत. अपघात झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत असंही बच्चू कडू यांनी पोलिसांना सांगितलं. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केलीय.
News18
News18
advertisement

सध्या बच्चू कडू यांना पोलिसांची वाय प्लस सुरक्षा आहे. बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. बच्चू कडू यांचा घातपात करण्याचा कोणाचा प्लँन? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहिलेलं पत्र समोर आलं आहे.  यात धमकी देणाऱ्याने मी शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे. तसंच आपले नक्षलवाद्यांशी नजीकचे संबंध असल्याचंही म्हटलं आहे.

advertisement

बच्चू कडू यांनी पत्रात म्हटलं की, अचलपूरमध्ये भाजी विक्रेत्याजळ एका दुचाकीवरून आलेल्या माणसाने भाजी विक्रेत्यासोबत बोलताना आपण शिंदे साहेबांचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं आणि बच्चू कडूला संपवणार असल्याचं म्हटलं. शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार. नाहीतर मीच बच्चू कडूला संपवणार असं म्हणत शिंदे साहेब आणि मंत्र्यांसोबतचे फोटोही दाखवले. माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचे कट रचले जात अून जिविताला धोका निर्माण झाला असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

advertisement

बच्चू कडू यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मतदारसंघातील अनेकांचे त्यांना गेल्या काही दिवसांपासून तब्येतीची विचारपूस करणारे फोन येत आहेत. यात अनेकांनी भाऊ तुमचा अपघात झाला का अशी विचारणा केलीय. आपल्याबाबत अशा अफवा पसरवल्या जात असल्याचं बच्चू कडू यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

काय दिली धमकी?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे ...मी गडचिरोली येथे राहत असून माझे नक्षलवाद्यांशी नजीकचे संबंध आहे, बच्चू कडूला पाहून घेऊ. जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेंना संपवले तसं शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार. नाही तर मी स्वतः बच्चू कडूला संपवणार.. बच्चू कडू म्हणजे काहीच नाही, बच्चू कडूला पाहून घेऊ... आज मोका देख के बच्चू कडू को चौका मारेंगे

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्याकडून धमकी, जिवीताला धोका; बच्चू कडूंच्या पत्राने खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल