दिवसा येथे काल युवा स्वाभिमानच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमरावती लोकसभेच्या खासदार नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्या व प्रचार मात्र दुसऱ्याचा केला असा गंभीर आरोप केला.
राणा आणि कडूंच्या वादात आता काँग्रेसची उडी, अमरावतीत तिहेरी वाद
advertisement
दरम्यान, 2019च्या निवडणुकी यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून पैसे घेतल्याच्या नवनीत राणांच्या आरोपानंतर यशोमती ठाकूर संतापल्या. 2019 मध्ये पैसे घेतले असेल तर सिद्ध करून दाखव. राजकारण सोडून देऊ असं म्हणताना यशोमती ठाकूर यांची जीभ घसरली. आता यशोमती ठाकूर यांना खासदार नवीन राणा यांनी उत्तर दिलं आहे.
नवीनत राणा म्हणाल्या की, यशोमती ताई जे बोलतायत त्यांना सांगणं आहे की चेक दिले असते तर पुरावे ठेवले असते. पण रवी राणा यांनी कडक नोटा दिल्या आहेत. लहान लेकरालासुद्धा माहितीय त्याचे पुरावे नसतातच. माझं बोलणं एवढं झोंबायचं कारण नाही. खरं बोलले म्हणून ताईंना झोंबलं. रुग्णालयात जाऊन एकदा चेकअप करून घ्या. बीपी वाढलाय हे दिसतंय. ज्या पद्धतीची भाषा एका महिलेबद्दल बोलताय हे शोभणारं नाही. डॉक्टर औषध देत नसेल तर मी पाठवेन.
