गेल्या तीन वर्षांपासून अमरावती महानगरपालिकेत प्रशासक राज असल्याने कंत्राटदारांचं स्वच्छतेवर व साफसफाईवर पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे शहरातील अस्वच्छतेच्या मुद्यावरून आमदार रवी राणा चांगलेच आक्रमक झाले. रवी राणा यांनी चक्क मनपा कार्मचाऱ्याला नातील उतरवून साफसफाई करायला लावली.
यानंतर आता साफसफाईच्या मुद्यावरून पुन्हा एकदा महायुतीत असलेला अंतर्गत वाद समोर आला आहे. घडलेल्या या प्रकारानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते तुषार भारतीय यांनी आमदार रवी राणांवर मनपा आयुक्तांनी सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. निवडणूक जवळ आल्यामुळे रवी राणांना आता शहरातील समस्या दिसत आहेत, जनता यांना माफ कतरणार नाही अशी टीका देखील तुषार भारतीय यांनी केली आहे.
advertisement
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
August 16, 2024 9:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
रवी राणा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, मनपा कर्मचाऱ्याला साफ सफाईसाठी उतरवलं नाल्यात
