नेमकं काय म्हणाले गडकरी?
' मी संकल्प केला आहे की, देशातून येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेलला हद्दपार करनार. वाहतूक पद्धतही बदलत जाणार आहे, मेळघाट सारख्या परिसरात ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर सुरू होणं गरजेचे आहे. देशात ड्रायव्हरची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. ड्रायव्हरने फक्त आठ तास ड्रायव्हिंग करावे असा नियम करणार आहे. वाहन चालकांना व्यवस्थित परीक्षा घेऊन त्यांना लायसन देण्यात यावं, लायसन देण्यात फ्रॉड होऊ नये, एका ड्रायव्हरवर अनेकांचं जीवन अवलंबून असतं' असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या देशाला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतून साडेचार कोटी रोजगार मिळतो. येणाऱ्या काळात या इंडस्ट्रीमध्ये भारत जगातल पहिल्या क्रमांकावर राहिली. देशात शेतकऱ्यांना समृद्ध करण्याकरता इथेनॉल पॉलिसी आणली, ही इकॉनॉमी दोन लाख कोटींवर पोहोचली आहे. देशात लवकरच 400 इथेनॉल पंप सुरू करू, त्यामुळे ट्रान्सपोर्ट स्वस्त होणार आहे.
