अमरावती - अमरावतीमधील गोराळा गावापासून 2 किलोमीटर आत स्थित असलेल्या पिंगळा देवी संस्थानमध्ये नवरात्र उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. नवरात्रीमध्ये या ठिकाणी मोठी यात्रा असते. लाखो लोक इथे दर्शनासाठी येतात. नवरात्रीमध्ये इथे विशेष पूजा केली जाते. त्याला खापरी पूजा म्हणतात.
या नवरात्रीमध्ये सप्तमीसह अष्टमी तिथीला हा उत्सव साजरा करण्यात आला. हा उत्सव कसा साजरा केला जातो? खापरी पूजा नेमकी कशी केली जाते? ते आज आपण जाणून घेऊयात.
advertisement
पिंगळा देवी संस्थान येथील वंश परंपरागत पुजारी संदिप मारुडकर यांनी लोकल18 सोबत याबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, गोराळा येथून 2 किमी अंतरावर पिंगळा देवी गडावर स्थित आहे. विदर्भातील साडे तीन शक्ती पिठापैकी हे अर्ध शक्तीपीठ आहे. या ठिकाणी दरवर्षी नवरात्रीमध्ये विशेष पूजा केली जाते. तिला खापरी पूजा असे म्हणतात. ही पूजा अनेक वर्षापासून सप्तमीसह अष्टमी तिथीला करण्यात येत आहे. या वर्षी ही पूजा अष्टमीला पार पडली. या पूजेचा मान मारुडकर कुटुंबाचा आहे.
खापरी पूजाविधी काय?
एक मातीचे माठासारखे पात्र असते, त्याला खापरी पात्र म्हणतात. त्यामध्ये रात्रभर हवन केले जाते. मंत्र, आहुती, जप करून रात्रभर हवन केले जाते. त्यात 16 नारळ, तूप आणि बाकी पूजेचे साहित्य असते. रात्रभर हवन झाल्यानंतर ते पात्र डोक्यावर घेऊन देवीला 5 प्रदक्षिणा मारल्या जातात. त्यावेळी तेथील दृश्य अतिशय आकर्षक असते. ढाल, तलवार घेऊन मोठ्या जोशात "देवी आईचा उदो उदो" असे म्हणत प्रदक्षिणा मारल्या जातात. हा मान मुख्य पुजाऱ्यांना असतो.
कोल्हापूरचा शाही दसरा, 89 वर्ष झाली तरी आजही आहे “मेबॅक कार"चं आकर्षण, कारण काय?
मंदिराच्या 5 प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर हे पात्र कापूर तलावामध्ये शिरवल्या जाते. कापूर तलाव हा मंदिरापासून काही अंतरावर आहे. तेथील पाणी देवीच्या नैवद्य, अंघोळीसाठी आणले जाते. हा तलाव चमत्कारिक तलाव म्हणून सुद्धा ओळखला जातो. या तलावातील पाण्याचे अंघोळ केल्यास रोगराई बरी होते, याची अनुभूती अनेक लोकांना आली आहे, अशी माहिती पुजारी संदिप मारुडकर यांनी दिली.