पोलीस प्रशासन काय म्हणतंय?
सध्या शिरोली येथे तावडे हॉटेल, सांगली फाटा, नागाव फाटा आणि शिरोली एमआयडीसी येथील पुलांची कामे सुरू असल्याने आधीच या भागात वाहतूक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत पंचगंगा नदीवरील एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवल्यास ती वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागण्याची शक्यता आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोमवारी दुभाजक ठेवून एकेरी वाहतुकीचे प्रात्यक्षिकही पाहिले.
advertisement
नवरात्रीमुळे धोका वाढणार येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवामुळे कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण प्रचंड वाढणार आहे. ही बाब लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने महामार्ग प्राधिकरणाला पुलावरील वाहतूक लगेच बंद न करण्याची विनंती केली आहे.
पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन या परिस्थितीत महामार्ग प्राधिकरणाने स्थानिक वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
- पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी : कसबा बावडामार्गाचा अवलंब करावा.
- कर्नाटककडे जाणाऱ्या वाहनांनी : शिवाजी विद्यापीठामार्गे सरनोबतवाडीकडे जाता येऊ शकते.
या पर्यायी मार्गांचा वापर करून नागरिक पंचगंगा नदीवरील पुलावर होणारी वाहतूक कोंडी टाळू शकतात, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा : बीडकरांना पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची मोठी भेट
हे ही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचे थैमान, शेतीपिकांचं नुकसान, विखेंचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश