TRENDING:

दूर्गराज रायगडावर सापडले यंत्रराज सौम्ययंत्र! का आहे खास? कशासाठी व्हायचा वापर?

Last Updated:

Raingad News: स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावर एक खगोलीय यंत्र आढळले आहे. यंत्रराज सौम्ययंत्राबाबत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी माहिती दिलीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड महाराष्ट्राचं प्रेरणास्थान आहे. या अभेद्य किल्ल्याच्या बांधकामाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण पुरावा नुकताच समोर आला आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन प्रक्रियेत रायगडावर प्राचीन ‘यंत्रराज’ सौम्ययंत्र नावाचे खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे. या शोधाने रायगडाच्या बांधकामातील शास्त्रोक्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरावा मिळाला आहे. याबाबत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या यंत्राच्या वैशिष्ट्यांबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement

इंद्रजित सावतं सांगतात की, “रायगड किल्ल्याचे बांधकाम तत्कालीन खगोलशास्त्रीय अभ्यास आणि शास्त्रोक्त पद्धतीने झाले होते. सौम्ययंत्र हे उपकरण त्या काळातील वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्र यांच्या समन्वयाचे प्रतीक आहे. हे यंत्र सूर्य, चंद्र आणि इतर खगोलीय पिंडांच्या हालचालींचा अभ्यास करून किल्ल्याच्या बांधकामासाठी दिशा आणि कालमापन निश्चित करण्यास उपयोगी ठरले असावे. या यंत्राच्या शोधाने रायगडाच्या बांधकामातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तत्कालीन तंत्रज्ञानाची प्रगती अधोरेखित झाली आहे.”

advertisement

Travel: धुकं आणि पाऊस, स्काय सायकलिंगचा आनंद घ्यायचाय? पावसाळ्यात द्या मेळघाटला भेट, Video

संभाजीराजे छत्रपती यांनी या शोधाबाबत फेसबुक पोस्टद्वारे माहिती देताना सांगितले की, “गेल्या तीन ते चार वर्षांपासून रायगडावर उत्खननाचे कार्य सुरू आहे. या उत्खननात रोपवे अप्पर स्टेशनच्या मागील बाजूस, कुशावर्त तलावापासून ते बाजारपेठ आणि जगदीश्वर मंदिरापर्यंतच्या भागात शिवकालीन वाड्यांचे अवशेष सापडले आहेत. या अवशेषांमधून स्वराज्याच्या प्रशासकीय आणि सांस्कृतिक वैभवाची झलक मिळते. याच उत्खननादरम्यान सौम्ययंत्राचा शोध लागला, ज्यामुळे रायगडाच्या बांधकामातील खगोलशास्त्रीय दृष्टिकोनाचा पुरावा मिळाला.”

advertisement

भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी आणि रायगड विकास प्राधिकरण यांनी या शोधाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांच्या मते, सौम्ययंत्र हे केवळ खगोलशास्त्रीय उपकरणच नाही, तर स्वराज्याच्या वैज्ञानिक प्रगतीचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे. या यंत्राच्या अभ्यासातून रायगडाच्या बांधकामातील अचूकता, नियोजन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा अधिक खुलासा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

advertisement

हा शोध इतिहासप्रेमींसाठी आणि संशोधकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रायगड किल्ला केवळ एक लष्करी किल्ला नसून, तो स्वराज्याच्या वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय प्रगतीचे केंद्र होता, हे या शोधाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. रायगड विकास प्राधिकरणाने यापुढेही उत्खननाचे कार्य सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून, भविष्यात आणखी काही महत्त्वपूर्ण पुरावे समोर येण्याची शक्यता आहे. याचे एक संग्रहालय रायगडाजवळ सुरू व्हावे, अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केलीये.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात सुरू केली फूड स्कॉलरशिप, कुलदीप यांचे काम पाहून तुम्हीही कराल कौतुक!
सर्व पहा

दरम्यान, यंत्रराज सौम्ययंत्राचा हा शोध रायगडाच्या गौरवशाली इतिहासाला नवे परिमाण देणारा ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या वैभवाची आणि वैज्ञानिक प्रगतीची साक्ष देणारा हा पुरावा मराठ्यांच्या इतिहासाचा अभिमान वाढवणारा आहे, अशी भावना इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केलीये.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दूर्गराज रायगडावर सापडले यंत्रराज सौम्ययंत्र! का आहे खास? कशासाठी व्हायचा वापर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल