अथांग हा छत्रपती संभाजीनगर शहरातील डॉ. दिपक अपार आणि डॉ. रिद्धी अपार यांचा मुलगा आहे. त्याने 13 मिनिटे 50 सेकंदामध्ये 150 फ्लॅश कार्ड ओळखले आहेत. त्याने शास्त्रज्ञ व त्यांचे शोध, जगातील सर्व देशांचे ध्वज, भारतातील नामवंत व्यक्तिमत्त्व अचूकपणे ओळखले. त्यामुळे त्याच्या नावाची नोंद 'वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये झाली आहे.
advertisement
Blood Donation: एका क्लिकवर मिळेल रक्तदाता! अॅप्लीकेशन ठरेल तारणहार, पुणेकर तरुणांची कमाल
अथांगची आई डॉ. रिद्धी अपार म्हणाल्या, "अथांग दीड महिन्याचा होता तेव्हापासून त्याला मी वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅश कार्ड दाखवते. सात-आठ महिन्यांचा झाल्यानंतर तो फ्लॅश कार्ड ओळखू लागला. तेव्हा आमच्या लक्षात आलं की, याची स्मरणशक्ती खूप चांगली आहे. तेव्हापासून आम्ही त्याला अगदी हसत खेळत फ्लॅश कार्ड आणि इतर गोष्टी शिकवू लागलो. आम्ही त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बर्डन टाकलं नाही."
अथांगचे वडील डॉ. दीपर अपार म्हणाले, "त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळी माहिती जाणून घ्यावी. ही माहिती आणि आपल्या बुद्धीच्या आधारे त्याने एखादा वर्ल्ड रेकॉर्ड करावा, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत."