बारामती तालुक्यातील माळेदाव नगरपंचायतीमध्ये दोन उमेदवारांना समान मते पडल्याने लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढून उमदेवाराला विजयी घोषित केलं. यामुळे मेहनतीने कमावले आणि नशिबाने गमावले अशी म्हणण्याची वेळ पराभूत उमेदवारावर आली. एका अपक्ष उमेदवाराचा ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून विजय झाला आहे. बारामती नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नगराध्यक्ष सचिन सदाशिव सातव हे राज्यातील विक्रमी 34214 मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत
advertisement
माळेगावात ईश्वर चिठ्ठीतून अपक्ष विजयी
माळेगाव नगर पंचायत भाजप राष्ट्रवादीच्या ताब्यात आली असून अजित पवारांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी झाला आहे. माळेगावामध्ये राष्ट्रवादी-भाजपने 17 पैकी 10 ठिकाणी विजय मिळवला. यामध्ये एका अपक्ष उमेदवाराचा ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून विजय झाला आहे. गायत्री राहुल तावरे आणि जयश्री बाळासाहेब तावरे या दोन्ही उमेदवारांना 616 मत अशी समान पडल्याने ईश्वर चिट्ठी काढण्यात आली. यामध्ये अपक्ष उमेदवार जयश्री बाळासाहेब तावरे या विजयी झाल्या आहेत.
माळेगावातील विजयी अपक्ष उमेदवारांची यादी
प्रभाग 1 दिपाली अनिकेत बोबडे - अपक्ष
प्रभाग 3 रेश्मा सय्यद - महिला अपक्ष
प्रभाग 6 वैभव खंडाळे - अपक्ष
प्रभाग 7 पप्पू खरात - अपक्ष
प्रभाग 9 गायत्री राहुल तावरे आणि जयश्री बाळासाहेब तावरे या दोन्ही उमेदवारांना 616 मत अशी समान पडल्याने ईश्वरचिट्ठी काढण्यात आली. यामध्ये अपक्ष उमेदवार जयश्री बाळासाहेब तावरे या विजयी झाल्या आहेत.
पुण्यातील नगरपरिषदांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व
पुण्यातील नगरपरिषदांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. बारामती, माळेगाव, जेजुरी, इंदापूर, दौंड, भोर , जुन्नर , शिरूरमध्ये अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर सासवडमध्ये भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.
हे ही वाचा :
