विदीप जाधव हे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. ते मागील काही वर्षांपासून अजित पवार यांचे पीएसओ म्हणून काम करत होते. अजित पवार कुठेही गेले तरी त्यांच्या जीवाची रक्षा करण्यासाठी विदीप जाधव सावलीसारखे त्यांच्यासोबत असायचे. त्यामुळे त्यांना अजित पवारांची सावली देखील म्हटलं जायचं. पण बुधवारी झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह विदीप जाधव यांचाही दुर्दैवी अंत झाला.
advertisement
या घटनेनंतर बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास विदीप जाधव यांचं पार्थिव तरडगावच्या पालखी स्थळावर आणण्यात आलं. याठिकाणी शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तरडगाव मध्ये रात्री उशिरा पार्थिव पोहोचल्यानंतर अंत्ययात्रा काढून अंत्यविधी पार पाडण्यात आला. यावेळी त्यांना पोलिसांनी हवेत गोळीबार करत त्यांना मानवंदना दिली. विदीप जाधव यांच्या जाण्याने पोलीस दल, कुटुंबीय आणि त्यांचा मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.
दुसरीकडे, आज सकाळी अकरा वाजता अजित पवारांवर देखील अंत्यसंस्कार करण्यात आले. देशभरातील अनेक नेते पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांच्या उपस्थित हा अत्यंविधीचा कार्यक्रम पार पडला. या घटनेनं पवार कुटुंब पूर्णपणे हादरून गेलं आहे. अजित पवारांचे पूत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. यावेळी जमलेल्या नागरिकांनी प्रचंड आक्रोश केला.
