TRENDING:

जुगाड नाही तर टॅलेंट! दुचाकीच्या इंजिनवर बनवली अनोखी जीप; आता मिळाली 'मिनी विमाना'ची ऑर्डर

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: सतीश मुंडे आपल्या वर्कशॉपमध्ये विविध प्रकारचे प्रयोग नेहमी करत असतो. यापूर्वी ट्रॅक्टर, हेलिकॉप्टरचे प्रयोग यशस्वी झाले. त्याची माहिती समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला आणि झपाटून कामाला लागलं तर काहीही अशक्य नाही, असं म्हटलं जातं. हेच छत्रपती संभाजीनगरमधील एका तरुणानं आपल्या कृतीतून करून दाखवलंय. वाळूज एमआयडीसी परिसरात सतीश मुंडे याचं वर्कशॉप असून याठिकाणी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जातात. ट्रॅक्टर, हेलिकॉप्टर बनवल्यानंतर आता याठिकाणी एक मिनी जीप बनवण्यात आलीये. आता याच अनोख्या जीपची सर्वत्र चर्चा आहे.
advertisement

सतीश मुंडे आपल्या वर्कशॉपमध्ये विविध प्रकारचे प्रयोग नेहमी करत असतो. यापूर्वी ट्रॅक्टर, हेलिकॉप्टरचे प्रयोग यशस्वी झाले. त्याची माहिती समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली. त्यामुळे नाशिक येथून एक मिनी जीप तयार करण्याची ऑर्डर मिळाली. ही मिनी जीप तयार करण्यासाठी साधारणपणे चार महिन्यांचा कालावधी लागला.

मुंबई-गोवा महामार्गावर वाढले अपघात, इंजिनिअर तरुणानं केलं असं, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा, Video

advertisement

कशी आहे मिनी जीप?

या जीपला हिरो होंडा ग्लॅमर टू या दुचाकीचे इंजिन बसवण्यात आले आहे. तर हेडलाईट एमएटी गाडीची लावण्यात आली आहे. याबरोबरच टायर महिंद्रा अल्फा या थ्री व्हीलर गाडीचे बसवले आहेत त्यामध्ये स्टेरिंगसह गिअर बॉक्स व इतर सर्व सामान स्वतः बनवले असल्याचे सतीश मुंडे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

advertisement

या मिनी जीपला इतर गाड्यांप्रमाणे चालू बंद करण्यासाठी स्विच बसवण्यात आले आहे. हेडलाईट ऑन ऑफ करण्यासाठी वेगळे स्विच आहे. तसेच पाठीमागच्या बाजूला पार्किंग करण्यासाठी इंडिकेटर आणि स्वतंत्र स्विच यंत्रणा आहे. दुचाकी प्रमाणे गिअर दिलेले आहेत. विशेषतः ही मिनी जीप लहान मुलांसाठी आहे, मात्र या जिपला मोठे व्यक्ती देखील चालू शकतात. तसेच कृषी पर्यटन केंद्र, हुरडा स्टॉल सारख्या ठिकाणी व हॉटेल, रेस्टॉरंट आणि पार्क सारख्या विविध ठिकाणी ही गाडी वापरता येते.

advertisement

गाडीला खर्च किती आला अन् विक्री कशी? 

मिनी जीप - गाडी तयार करण्यासाठी विविध वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. त्यामध्ये मेटल, गिअर बॉक्स, कलरिंग, टायर यासह एकूण खर्च साधारणपणे 1.50 लाखांपेक्षा अधिक आला आहे. या गाडीची विक्री किंमत 2.50 लाख रुपये आहे.

तरुणांना सल्ला व पुढचा प्रयोग काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जुगाड नाही तर टॅलेंट! दुचाकीच्या इंजिनवर बनवली जीप; आता 'मिनी विमाना'ची ऑर्डर
सर्व पहा

विविध प्रयोग यशस्वी केल्यानंतर आंध्र प्रदेश राज्यातून ऑनलाइन ऑर्डर मिळाली आहे. त्यामध्ये मिनी विमान तयार करायचे आहे. ते विमान एका सीटसाठी असणार आहे. याबरोबरच तरुणांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्यामध्ये मन लावून काम केलं तर काहीही करता येते. माझे वर्कशॉप असल्यामुळे आणि या क्षेत्रात आवड असल्याने आतापर्यंत हाती घेतलेले सर्व प्रयोग यशस्वी झाले असल्याचे देखील मुंडे यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
जुगाड नाही तर टॅलेंट! दुचाकीच्या इंजिनवर बनवली अनोखी जीप; आता मिळाली 'मिनी विमाना'ची ऑर्डर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल