आमच्या घरातच फूट पडल्याने तुम्हालाही कळत नाहीइकडे आड तिकडे विहीर झाली आहे. तुम्हालाही कळत नाही नेमकं काय करायचं. आता लोकसभेला एका बाजूला आड दुसऱ्या बाजूला विहीर होती. त्यावेळी आडाला खूश केले आता विहीरीला खूश करा, अशी भावनिक साद अजित पवारांनी घातली आहे. तसेच गावागावत शरद पवारांचा फोटो लावला आहे. निवडणुकीला उभे कोण युगेंद्र पवार... साहेब निवडणुकीला उभे राहिलेले नाहीत. तुझ्या नावावर मतं माग ना... असा सल्ला देखील अजित पवारांनी दिला आहे.
advertisement
लोकसभेला गंमत केली आता विधानसभेला करू नका, नाहीतर तुमची जंमत होईल: अजित पवार
अजित पवार म्हणाले, लोकसभेला थोडी गंमत केली. आता ते मी काढत नाही. आता मात्र विधानसभेला पुन्हा गंमत करू नका नाहीतर तुमची जंमत होईल. मी खोटं नाही सांगत काही भावनिक करण्याचा प्रयत्न केला तर त्याची मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल. परत बारामतीकरांना कोणी वाली राहणार नाही. साहेबांनी सांगितले दीड वर्षानंतर मी निवडणूक लढवणार नाही. त्यानंतर कोण बघणार हे तुम्हीच सांगा....
काम मी करायची आणि मतं तिकडं द्यायची हा कोणता न्याय : अजित पवार
बारामतीत कोणाची दादागिरी, भाईगिरी चालणार नाही. आम्हाला समाजाचा विकास करायचे आहे. लोकसभेला तुम्ही मी दिलेल्या उमेदवाराला 594 मतं दिली आणि विरोधात असलेल्या उमेदवाराला 1094 मतं दिली. काम मी करायची मी आणि मतं द्यायची तिकडे हा कसला न्याय आहे, असे अजित पवार म्हणाले.
