बीडच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुकादमचे बंधू मधुकर राठोड यांनी त्यांच्या बाबतीत घडलेला प्रकार सांगितला आहे. आज बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पत्रकार परिषद घेतली आणि माजी खासदार रणजीत निंबाळकर यांनी तेथे कशा पद्धतीने मुकादमांचा छळ केला याची माहिती दिली. यावेळी एका मुकादमाच्या भावाने त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला . माझ्या भावाकडे थकीत रक्कम राहिली होती. गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर तीन कारखान्याच्या गाड्या आल्या आणि दरोडा टाकला. महिलांशी हुज्जत घालून खासदारांना आणि पीआय आटोळेंना फोन केला आणि मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
पैशांची वसुली कशी केली?
एवढच नाही तर दुसऱ्या वेळी माझ्या भावाला उपळी स्टँडहून फलटणला घेऊन गेले.आम्ही व्यवहार मिटवण्यासाठी गेलो तर मला फलटणच्या बस स्टॅण्डवर एटीएममधून पैसे काढले.तिथे दोन स्कॉर्पिओ गाड्या भरून आल्या. झाडाला पाय बांधायचे आणि मला मारहाण करायचे. माझं पूर्ण शरीर खिळखिळं केलेलं आहे. कारखान्याच्या पुजारींनी माझं वाटोळं केलं आहे. मला भाजीमंडीतून उचलून नेऊन विमानतळावर नेऊन मारहाण केली, मला पोलीस स्टेशनला नेलं आणि पोलीसने धमकी दिली.सकाळपर्यंत पैशाची तजवीज कर नाहीतर तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होईल, अशी धमकी दिल्याचे देखील सांगितले आहे.
माझ्या जीवाला धोका आहे, मुकादमाचे बंधू मधुकर राठोडांची माहिती
मी त्यांना विनंती करत होतो माझे लेकरं लहान आहेत.. मला जीव जाईपर्यंत मारू नका. मला मारहाण केलेला फोटो आहे माझ्याकडे..सगळ्यात अगोदर पुजारीला ताब्यात घ्या सगळं उघड होईल. माझ्या जीवाला धोका आहे हे मी मीडियासमोर सांगतो, अशी विनंती देखील मुकादमाचे बंधू मधुकर राठोड यांनी केली आहे.
