मिळालेल्या माहितीनुसार, मृत यश ढाका आणि सूरज काटे हे दोघे चांगले मित्र होते. महिन्याभरापुर्वीच या दोघांची एका बर्थडे पार्टीत वाद झाला होता. या वादानंतर दोघांमध्ये कटूता आली होती. तसेच एकमेकांविरूद्ध सुडाची भावना निर्माण झाली होती. त्यात आज यशच्या एका टपरीवर उभा असताना सूरज त्यांच्यासमोर आला होता.यावेळी पुन्हा त्यांच्यात वाद सूरू झाले होते. या वादादरम्यानच सुरजने खिशातून चाकू काढून यशच्या छातीत खुपसला होता. यात रक्तबंबाळ होऊन यश खाली कोसळला होता. त्यानंतर यशच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले,तर सुरज हा फरार झाला होता.शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स भागात हा खून झाल्याने बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
advertisement
खरं तर छातीत झालेले दोन वार आरपार गेल्याने यश ढाका रक्तबंबाळ झाला होता. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले होते.यश हा अभियांत्रिकीचे (इंजिनिअरिंगचे) शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा करताना वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान या घटनेनंतर सूरजने घटनास्थळावरून पळ काढला होता.त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिवरली होती. यानंतर अर्ध्या तासातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरज आप्पासाहेब काटे (वय २१, रा. बीड) या आरोपीला बेड्या ठोकून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरू आहे.