TRENDING:

धनुभाऊंच्या बीडमध्ये अजितदादांना धक्का; निकाल पहिला फिरला, पहिले आकडे समोर

Last Updated:

बीड नगरपरिषदेत भाजपा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत काटे की टक्कर आहे असून भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने खाते उघडले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. राज्यातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून पहिले निकाल हाती येत आहे.बारामती, बीड, मालवणमध्ये अटीतटीची लढत असून राज्याचे लक्ष लागले आहे. बीड जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आह. या निवडणुकांकडे संपूर्ण जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचेही लक्ष लागले असून, प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगरपरिषद निवडणुकीचा पहिला कल हाती लागले आले असून भाजपने मुसंडी मारली आहे. भाजप १०० जागांवर आघाडीवर आहे. बीड नगर परिषदेत भाजपा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत काटे की टक्कर आहे असून भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने खाते उघडले आहे.
News18
News18
advertisement

बीड नगरपरिषदेची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पार पडणार असून, यासाठी एकूण 18 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर गेवराई नगरपरिषदेची मतमोजणी नगरपरिषद इमारतीमध्येच होणार असून, तेथे 15 टेबलांवर मतमोजणी केली जात आहे. बीड जिल्ह्यातून पहिला निकाल हाती आला आहे.

बीड (Beed Nagar Parishad) 

बीड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्मिता वाघमारे यांच्या पतीचा पराभव झाला आहे.

advertisement

बीड नगरपालिका प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपाचे नितीन साखरे, शुभम धूत विजयी झाले आहेत

माजलगाव (Majalgaon Nagar Parishad) 

माजलगाव येथील प्रभाग क्रमांक एक मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल सरवदे विजयी झाले आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद यादव विजयी झाले आहेत

अंबाजोगाई (Ambajogai Nagar Palika)

advertisement

बीडच्या आंबेजोगाई नगरपालिका तिसऱ्या फेरीनंतर  भाजपचे  नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

  • नंदकिशोर मुंदडा - 15044  (BJP)  आघाडीवर
  • राजकिशोर मोदी - 13590 घड्याळ
  • आघाडी - 1454

परळी वैजनाथ  (Parali Nagar Parishad) 

धनंजय मुंडेंच्या परळीत पहिल्या फेरीनंतर  अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर आहेत

पहिली फेरी

  • पद्मश्री धर्माधिकारी घड्याळ - 2579
  • advertisement

  • संध्या देशमुख तुतारी - 1229
  • काँग्रेस- 1080
  • घड्याळ लीड  -1350

बीडमध्ये काय चित्र आहे?

बीडमध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शरद पवार गट अशी तिरंगी लढत होत आहे.. या ठिकाणी अजित पवार यांनी लागोपाठ दोन प्रचार सभा घेतल्या.. तर आज मुख्यमंत्र्यांची सभा भाजपासाठी होत आहे.. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आमदार विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आमदार संदीप क्षीरसागर तर भाजपा कडून डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात मोठी घसरण, शनिवारी सोयाबीन आणि कांद्याला किती मिळाला दर?
सर्व पहा

(ही आकडेवारी सकाळी ११ वाजेपर्यंत समोर आलेल्या कलांवर आधारीत)

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धनुभाऊंच्या बीडमध्ये अजितदादांना धक्का; निकाल पहिला फिरला, पहिले आकडे समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल