पालकमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का देत पंकजा मुंडे यांची खेळी यशस्वी झाली आहे. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांची रणनिती यशस्वी ठरली बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, धारूर मध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आघाडीवर आहे. पंकजा मुंडे यांनी नव्या, जुन्यांना एकत्र करून निवडणूक आखली होती. ती रणनीती यशस्वी ठरली आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
शरद पवारांना देखील धक्का
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचे पती दीपक देशमुख यांचा पराभव झाला आहे.प्रभाग क्रमांक सहा मधून दीपक देशमुख यांनी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे व्यंकटेश शिंदे यांचा विजय झाला आहे. बीड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्मिता वाघमारे यांच्या पतीचा पराभव झाला आहे.बीड नगरपालिका प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपाचे नितीन साखरे, शुभम धूत विजयी झाले आहेत
बीडच्या आंबेजोगाई नगरपालिकेत भाजपा पुरस्कृत आघाडी विजयी झाली आहे. भाजप पुरस्कृत उमेदवार
नंदकिशोर मुंदडा हे 2497 मतांनी विजयी झाले आहेत.
- नंदकिशोर मुंदडा - 22777 (भाजप)
- राजकिशोर मोदी - 20280 (घड्याळ)
गेवराईत गीताभाभी पवार विजयी
तर बीडच्या गेवराई मध्ये भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीताभाभी पवार विजयी झाल्या आहेत.
माजलगाव (Majalgaon Nagar Parishad)
माजलगाव येथील प्रभाग क्रमांक एक मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल सरवदे विजयी झाले आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद यादव विजयी झाले आहेत.
बीडमध्ये काय चित्र होते?
बीडमध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शरद पवार गट अशी तिरंगी लढत होत आहे.. या ठिकाणी अजित पवार यांनी लागोपाठ दोन प्रचार सभा घेतल्या.. तर आज मुख्यमंत्र्यांची सभा भाजपासाठी होत आहे..
