संतोष वळे हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या विविध आंदोलनात सक्रिय सहभागी झाले होते. शेतकरी कुटुंबातून आलेले वळे यांना मुलांच्या भवितव्याची विशेष काळजी होती. त्यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षण सुरू असताना वारंवार "आपल्याला आरक्षण मिळत नाही, त्यामुळे पुढचा काळ फार कठीण आहे," अशी खंत ते व्यक्त करत असत. आरक्षणाच्या अनिश्चिततेमुळे आणि भविष्याबद्दलच्या चिंतेमुळे ते कायमच निराश राहायचे, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
advertisement
विषारी औषध प्राशन
दरम्यान, 2 सप्टेंबर रोजी त्यांनी आपल्या घरी विषारी औषध प्राशन केले. तातडीने त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय उपचार सुरू असतानाही अखेर शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी पल्लवी, दोन लहान मुलं, भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.
बीड जिल्ह्यात खळबळ
वळे यांच्या आत्महत्येमुळे मराठा आरक्षण चळवळीचा मुद्दा पुन्हा गंभीर झाला आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा, आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला; मात्र शेवटी त्यांना नैराश्यात टोकाचे पाऊस उचलले. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून स्थानिक समाजातून शासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये : मनोज जरांगे
कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील वारंवार करत आहे. त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलले जात आहे. गेल्या आठवड्यात आरक्षणामुळे राजकारणात निर्माण झालेल्या अस्थिरतेचे द्योतक आहेत. एका बाजूला मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी तीव्र होत आहे, दुसरीकडे ओबीसी आपले हक्क वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.