आता हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालून सदरील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज दिवसभर परळीतील बाजारपेठ दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांकडून सकाळी 9.30 वाजता राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक ते रेल्वे स्थानक परिसरात मूक मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. आजच्या परळी बंदला विविध पक्ष आणि संघटनांनी या आधीच पाठिंबा जाहीर केला आहे.
advertisement
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बीड बंदची हाक देखील आज देण्यात आली होती. मात्र, मुंबईत तोडगा निघाल्याने आता आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. तर दुसरीकडे बीडच्या परळी रेल्वे स्थानक परिसरात सहा वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे संताप व्यक्त केला जात होता.
बीडच्या परळी येथील रेल्वे स्थानक परिसरात बालकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रेल्वे स्टेशन तसेच परिसरातील सीसीटीव्ही तपासले होते. यामध्ये सदर आरोपी बालिकेला सोबत घेऊन जाताना दिसून आला होता, त्यानुसार परळी शहरातील बरकतनगर भागातील आरोपीला पोलिसांनी अटक केली गेली. पोलिसांनी सीसीटीव्हीचा तपास केल्यानंतर आरोपी चिमुकलीला हाताला धरून घेऊन जाताना दिसत आहे.