advertisement

Beed Crime : परळी रेल्वे स्थानक परिसरात 6 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणारा नराधम गजाआड, CCTV मध्ये घटना कैद!

Last Updated:

Parali Railway Station CCTV : घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रेल्वे स्टेशन तसेच परिसरातील सीसीटीव्ही तपासले होते. यामध्ये सदर आरोपी बालिकेला सोबत घेऊन जाताना दिसून आलाय.

Parali Railway Station CCTV
Parali Railway Station CCTV
Beed Crime News : बीड जिल्ह्यातील परळी रेल्वे स्थानकावर फक्त 6 वर्षांच्या लहान चिमुकलीवर अत्याचार (Parali Railway Station Crime) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. या प्रकरणानंतर परळीत संताप व्यक्त केला जात असून आरोपीला फाशीची मागणी केली जात आहे. अशातच आता सीसीटीव्ही व्हिडीओमधून (Parali Railway Station CCTV) आरोपीची ओळख पटली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक

बीडच्या परळी येथील रेल्वे स्थानक परिसरात बालकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रेल्वे स्टेशन तसेच परिसरातील सीसीटीव्ही तपासले होते. यामध्ये सदर आरोपी बालिकेला सोबत घेऊन जाताना दिसून आला होता, त्यानुसार परळी शहरातील बरकतनगर भागातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
advertisement

रेल्वे स्टेशनवर नेमकं काय झालं?

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या वेळी पंढरपूर येथून एक कुटुंब मुलांसह परळी रेल्वे स्थानकावर आले होते. दुपारी साधारण तीनच्या सुमारास त्यांनी रेल्वे स्टेशनवरच जेवण करून थोडा वेळ विश्रांती घेतली. त्याचवेळी एका नराधमाने सहा वर्षांच्या चिमुकलीला फसवून स्थानकावरील उड्डाणपुलाकडे नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून अत्याचारानंतर आरोपी पसार झाला होता.
advertisement

सीसीटीव्हीचा तपास अन् आरोपी सापडला

दरम्यान, पोलिसांनी तातडीने प्रकरण हाती घेतलं अन् आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्हीचा तपास केल्यानंतर आरोपी चिमुकलीला हाताला धरून घेऊन जाताना दिसत आहे. आता पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून अधिकची चौकशी केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : परळी रेल्वे स्थानक परिसरात 6 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणारा नराधम गजाआड, CCTV मध्ये घटना कैद!
Next Article
advertisement
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement