TRENDING:

Beed News: पती-पत्नीला लुटलं अन् तिथंच सगळं फसलं, बीडची ‘ती’ टोळी पोलिसांच्या जाळ्यात

Last Updated:

Beed News: बीड जिल्ह्याची गेल्या काही काळापासून वाढत्या गुन्हेगारी घटनांवरून चर्चा आहे. अशातच बीड पोलिसांनी मोठी कारवाई करत एका टोळीला जेरबंद केलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: गेल्या काही काळत बीड जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन फाट्याजवळ रस्त्यात अडवून लुटण्याच्या घटना घडत होत्या. काही दिवसांपूर्वीच पती-पत्नीला अडवून दागिने लुटण्याचा प्रकार घडला होता. आता याप्रकरणात बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली असून त्या टोळीतील दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळीला मोठा धक्का बसला आहे.
Beed News: पती-पत्नीला लुटलं अन् तिथंच सगळं फसलं, बीडची ‘ती’ टोळी पोलिसांच्या जाळ्यात
Beed News: पती-पत्नीला लुटलं अन् तिथंच सगळं फसलं, बीडची ‘ती’ टोळी पोलिसांच्या जाळ्यात
advertisement

या प्रकरणात कुलदीप ऊर्फ भोला अर्जुन पवार (वय 23, रा. राहेरा, जि. जालना) आणि विशाल यशवंत पवार (वय 18, रा. सातोना खुर्द, जि. जालना) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच दोन चोरीच्या मोटारसायकली असा एकूण 1 लाख 97 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, आणखी गुन्ह्यांचा तपास केला जात आहे.

advertisement

ड्रोन, घेराव आणि तासभर झडती; ‘या’ गावाला 100 पोलिसांनी घेरलं, बीडमध्ये आता काय घडलं?

लुटीची ही घटना 23 ऑक्टोबर रोजी घडली होती. फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे प्रवास करत असताना राक्षसभुवन फाट्याजवळ काही तरुणांनी त्यांची वाट अडवली. यावेळी धमकी देत फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मणी-मंगळसूत्र हिसकावून आरोपी पसार झाले होते. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती आणि नागरिकांनी पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी केली होती.

advertisement

तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे संशयितांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी मुकुंदवाडी परिसरातून चोरल्याची कबुली दिली. तसेच तलवडा आणि मुकुंदवाडी पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या सुमारे 1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकलीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
काळ्या तिळाची झाली भाव वाढ, आले आणि केळीचे गुरुवारी काय दर? Video
सर्व पहा

सदर कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके आणि पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष जंजाळ, दीपक लंके तसेच पोलिस कर्मचारी अशोक हंबर्डे, धीरज खांडेकर आणि गोरख डोके यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed News: पती-पत्नीला लुटलं अन् तिथंच सगळं फसलं, बीडची ‘ती’ टोळी पोलिसांच्या जाळ्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल