TRENDING:

Beed Crime : ब्लॅक मेलींगला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन, Whatsapp स्टेटसने फोडली गुन्ह्याला वाचा

Last Updated:

Beed Crime : गेवराई तालुक्यात सततच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुरेश जाधव, प्रतिनिधी
सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र
advertisement

बीड, 3 सप्टेंबर : बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. धमक्या व खोट्या तक्रारीला कंटाळून तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचं समोर आलंय. गेवराई तालुक्यातील कोपरा गावात ही घटना घडली. रामेश्वर महादेव डरपे, असं मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्याअगोदर त्याने सोशल मीडियावर स्टेटस ठेवत जीवन संपवलं.

काय आहे प्रकरण?

advertisement

'बस किस्मतने साथ नही दिया साहब, वरना दिल तो हमारा भी पागल था. किसीके लिए' असे व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत रामेश्वर डरपे यानेआत्महत्या केली. या प्रकरणी 7 जणांविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वरने स्वत: लिहिलेली एक चिठ्ठी त्याच्या खिशात मिळून आली. या प्रकरणी संजय डरपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालासाहेब उर्फ बालाजी अर्जुन ढगे (रा. टाकळगाव, ता. गेवराई), संदीपान देवीदास धोत्रे (रा. आंतरवली, ता. गेवराई), तानाजी सुरेश घोलप, सरस्वती सुरेश घोलप, सुरेश आसाराम घोलप (सर्व रा. तलवाडा), रामनाथ दाभाडे (रा. गेवराई) व अन्य एक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे.

advertisement

वाचा - पती कामावरून घरी परतला पण नको ते घडलं; पत्नी आणि मुलीला त्या अवस्थेत बघून हादरला

काका पुतणीच्या नात्याला काळीमा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांत वेगवेगळ्या गुन्ह्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी आष्टी तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय तरुणाचे लग्न झाले होते. पण पत्नी नांदत नसल्याने तो मोठ्या भावाकडे राहत होता. घरी कोणी नसल्याची संधी साधून तुझ्या आई, बापाला जिवे मारीन अशी धमकी देत अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केला. तेव्हापासून मुलगी भयभीत होऊन घाबरुन घरात राहत होती. पोटात दुखू लागल्याने आई, वडीलांनी तिला रूग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मुलगी गर्भवती असून तिला सातवा महिना असल्याचे सांगताच आई, वडिलाच्या पायाखालची वाळू सरकली. विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने घडलेल्या घटनेचा उलगडा केला. अंभोरा पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी चुलता फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Crime : ब्लॅक मेलींगला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन, Whatsapp स्टेटसने फोडली गुन्ह्याला वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल