पती कामावरून घरी परतला पण नको ते घडलं; पत्नी आणि मुलीला 'त्या' अवस्थेत बघून हादरला
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
बांसवाडा, 3 संप्टेबर : बांसवाडा शहरातील अंकलेश्वर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या बांसवाडामध्ये एका महिलेनं आधी आपल्या नऊ महिन्यांच्या मुलीला गळफास दिला, त्यानंतर तिने स्वत: देखील फाशी घेतली. या महिलेचा पती जेव्हा कामावरून घरी आला तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. हे प्रकरण प्राथमिक दृष्ट्या आत्महत्येचं आहे असं वाटतं, मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण कळेल अशी माहिती या प्रकरणात पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना या परिसरात असलेल्या एका झोपडीमध्ये घडली आहे. आई आणि मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला आहे. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुलीचं नाव दिव्या आणि तिच्या आईचं नाव रमिला असल्याची माहित समोर येत आहे.
पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पती दिनेश याने सांगितलं की तो सकाळी जेवण करून कामावर गेला होता. दुपारी जेव्हा तो घरी आला तेव्हा समोरचं दृष्य पाहून त्याला धक्काच बसला. दिनेश याला आणखी एक नऊ वर्षांची मुलगी देखील आहे, जी तिसरीमध्ये शिक्षण घेत आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Location :
Delhi Cantonment,New Delhi,Delhi
First Published :
September 03, 2023 8:11 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पती कामावरून घरी परतला पण नको ते घडलं; पत्नी आणि मुलीला 'त्या' अवस्थेत बघून हादरला


