घटनेची माहिती अशी की, बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आरोपीने पीडित महिलेला शेतात भाजीपाला घेण्यासाठी येण्यास सांगितले. महिला शेतात पोहोचल्यानंतर तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यानंतर हा प्रकार कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपी मधुकर उर्फ मदन विश्वनाथ म्हस्के (वय 57) याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचारानंतर मानसिक धक्का बसलेल्या महिलेने हिंमत दाखवत थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांच्या कानावर घातला.
advertisement
आंध्रातून रेल्वेनं यायच्या अन्...., छ. संभाजीनगरमध्ये महिलांचं मोठं कांड, दोघींसह दलाल जेरबंद
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या. पोलिस उपनिरीक्षक भीमराव मांजरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अमजद सय्यद आणि जमादार मोरे यांनी माहिती संकलन करून आरोपीचा शोध घेतला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी वेगाने कारवाई करत आरोपीला तासाभरात ताब्यात घेतले.
अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, तपासासाठी वेळ आवश्यक असल्याचे नमूद करत न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भीमराव मांजरे करत आहेत.






