फड गँगमधील सर्व सदस्यावर गंभीर गुन्हे असताना देखील मकोका रद्द कसं काय करण्यात आला? याचे कारण मात्र अद्याप समजू शकलं नाहीये. यात वाल्मीक कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गितेचाही समावेश आहे. परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या गोट्या गितेवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे १० ते १५ गंभीर गुन्हे नोंद असून तो अद्याप फरार आहे. गोट्या गिते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे आणि विलास गिते या पाच जणांवरील मकोका रद्द झाला आहे. तर टोळीप्रमुख रघुनाथ फड आणि धनराज उर्फ राजाभाऊ फड या दोघांवरच मकोका कायम ठेवण्यात आला आहे.
advertisement
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्याकील चार गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. त्यातील फड गँगमधील पाच जणांवर देखील मकोका लावण्यात आला होता. मात्र आता त्यांच्यावरील मकोका रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
खरं, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर बीडमध्ये अनेक संघटीत गुन्हेगारीच्या घटना उघडकीस आल्या होत्या. वेगवेगळ्या प्रकरणात या टोळ्या आरोपी होत्या. त्यामुळे फड टोळीवर पोलिसांनी मकोका कारवाई केली होती. आता ही कारवाई मागे घेण्यात आली आहे.