TRENDING:

आणखी एका दसरा मेळाव्याची भर... मनोज जरांगे पाटील गरजणार, मेळावा कुठे होणार?

Last Updated:

Manoj Jarange Patil: मनोज जरंगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यंदा दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळाव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच राज्याला दसरा मेळाव्याची मोठी परंपरा आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे हे एकेकाळी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना वर्षभराची राजकीय दिशा सांगून त्यांच्या मनात स्फुर्लिंग चेतवायचे. नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही दसरा मेळाव्याला मोठी परंपरा आहे. आता राज्याच्या दसरा मेळाव्याच्या परंपरेत आणखी एका मेळाव्याची भर पडणार आहे. तो मेळावा घेणार आहेत- मनोज जरांगे पाटील!
मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील
advertisement

गेली दीड वर्षे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी नऊ-नऊ दिवस प्राणांतिक उपोषण करून सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारे, आपल्या मागण्यांसाठी झगडणारे मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळावा घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. मराठा समाजाला एकत्रित बोलावून विधानसभेच्या तोंडावर मोठे शक्तिप्रदर्शन करायचे आणि त्यातून विरोधकांना आपली ताकद दाखवून द्यायची, असे जरांगे यांचे नियोजन असल्याचे कळते. गेल्या अनेक दिवसांपासून जरांगे यांनी भाजपविरोधात विशेषत: फडणवीस यांच्याविरोधात उघड उघड भूमिका घेतली आहे. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून तर त्यांच्या लढाईला नवे रुप प्राप्त होऊ शकते. विधानसभेच्या तोंडावर हा मेळावा होत असल्याने निवडणुकीचा रागरंग बदलण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

advertisement

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील उमेदवार ठरवून राज ठाकरे मुंबईकडे रवाना!

मनोज जरंगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यंदा दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. हा मेळावा कुठे घ्यायचा? स्वरूप कसे ठेवायचे ? याबाबतचे नियोजन करण्यासाठी रविवारी श्री क्षेत्र नारायणगड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील समन्वयक व मराठा समाज बांधवांची उपस्थिती राहणार असून या बैठकीतच मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा व ठिकाण ठरणार आहे.

advertisement

मागील अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्षाचे दसरा मेळावे पार पडतात. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार पंकजा मुंडे समर्थकांना दसरा मेळाव्यातून संबोधित करतात. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करतात. शिवसेना फुटीनंतर तर एकनाथ शिंदे यांनीही दसरा मेळाव्यातून शक्तिपर्दर्शन करण्याची संधी सोडली नाही. या सगळ्या दसरा मेळाव्याच्या मांदियाळीत जरांगे यांच्या मेळाव्याची भर पडणार आहे!

advertisement

महाराष्ट्रात कोणकोणते दसरा मेळावे पार पडतात?

आरएसएस दसरा मेळावा

शिवसेना ठाकरे गट

पंकजा मुंडे

शिवसेना शिंदे गट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

आता-मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
आणखी एका दसरा मेळाव्याची भर... मनोज जरांगे पाटील गरजणार, मेळावा कुठे होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल