शिवसेना युवा जिल्हा प्रमुख रवीराज बडे, शिवसेना युवा जिल्हा प्रमुख गजानन कदम आणि शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगिता चव्हाण यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. संगिता चव्हाण या राज्य महिला आयोगाच्या सदस्य देखील आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप आणि सचिन मुळूक यांच्या पुढाकारानं आज शिवसेना ठाकरे गटातील या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
advertisement
बीडमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. बीड जिल्हा युवा सेनेचे दोन जिल्हाप्रमुख आणि महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आज मुंबईमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. बीडमधून पाचशे गाड्यांचा ताफा हजारो शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या या पदाधिकाऱ्यांकडून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यामुळेच आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.