नवी मुंबई: नवी मुंबईत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर ड्रायव्हरचं अपहरण करून डांबून ठेवल्याचा प्रकार खेडकर कुटुंबाने केला होता. या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर दिलीप खेडकर हे फरार आहे तर आईवर गुन्हा दाखल झाला होता. अखेरीस या प्रकरणी खेडकर कुटुंबीयाला न्यायालयाने दिलासा दिला आहे. बेलापूर कोर्टाने मनोरमा खेडकर यांना अॅन्टिसिपेटरी बेल मंजूर केली असून त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तर दिलीप खेडकर अजूनही फरार आहे.
advertisement
नवी मुंबईत एका अपघातानंतर ट्रक हेल्परचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण झालेला बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या पुण्यातील बंगल्यात आढळून आला होता. हे अपहरण पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि त्यांचा अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे यांनी मिळून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले होते.
पण गेल्या सहा दिवसांपासून दिलीप खेडकर आणि ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंखे हा फरार आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या तीन वेगवेगळ्या टीम रवाना करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रबाळे पोलिसांनी प्रफुल्ल साळुंखेला ताब्यात घेतलं होतं. मात्र खेडकर कुटुंब सातत्याने फरार असल्यामुळे पोलिसांना मोठं आव्हान निर्माण झालं होतं. आज, मात्र मनोरमा खेडकर यांनी स्वतः कोर्टात हजर राहून अॅन्टिसिपेटरी बेलसाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्यांचा अर्ज मान्य करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात त्यांना तात्पुरता न्यायालयीन दिलासा मिळालेला आहे.
काय आहे प्रकरण?
दिलीप खेडकर आणि त्यांचा अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे यांनी मिळून तरुणाचे अपहरण केलं होतं. नवी मुंबई पोलिसांकडून तरुणाची सुखरूप सुटक केली असून नुकसानभरपाईच्या वादावरून अपहरण केल्याचं समोर आलं होतं. १४ सप्टेंबरला मुलुंड ते ऐरोली मार्गावर एक सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 नंबरच्या लँड क्रूझर गाडीमध्ये अपघात झाला होता. मिक्सर वाहन घेऊन जाणाऱ्या तरुणाची गाडी आणि खेडकर यांच्या गाडीचा अपघात झाल्याने दोघांमध्ये वाद झाला. नुकसानभरपाईचे पैसे न दिल्याने खेडकर यांचा पारा चढला. तरुणाला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचे सांगत थेट पुण्याच्या घरी नेऊन डांबून ठेवले.
डंपर चालकाच्या सहकाऱ्याने पोलिसांत तक्रार केल्यानंतर रबाळे पोलिसांनी एक पथक गाडीचा मागोवा घेत गेले. कारचा मागोवा घेत MH 12 RP 5000 नंबरच्या लँड क्रूझरचा शोध घेतला, ती गाडी पुण्यातील बाणेर रस्त्यावरील एका बंगल्याबाहेर उभी असल्याचे निष्पन्न झाले. हा बंगला पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचा असल्याचे समोर आलं.
मनोरमा खेडकरांनी पोलिसांच्या अंगावर सोडले कुत्रे
पोलिसांनी घरी येऊन दरवाजा उघडण्याची विनंती केली असता, दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. उलट, पोलिसांवर घरातील कुत्रे सोडले, असा दावा पोलिसांकडून केला होता. खेडकर यांच्या आईने पोलिसांना तपासात मदत न करता घातली पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना देखील या प्रकरणात सहआरोपी केलं होतं.