TRENDING:

राज्यातून मराठ्यांचे जत्थेच्या जत्थे मुंबईत, आता जरांगेंचे हात बळकट करण्यासाठी सीमाभागही एकवटला

Last Updated:

Maratha Reservation: आरक्षण लढ्यात मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी सीमा भागातील नागरिक एकवटले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी, कोल्हापूर : इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसीमधून मराठा आरक्षणाची मागणी करीत मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो मराठा बांधवांनी आझाद मैदानात ठिय्या मांडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई महापालिका परिसर, आझाद मैदाना, मंत्रालय आदी भागातील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. मराठा आंदोलकांचे जत्थेचे जत्थे मुंबईत येत असताना सीमाभागातूनही मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा मिळाला आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
advertisement

आरक्षण लढ्यात मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी सीमा भागातील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मूक मोर्चा बेळगावच्या वतीने आंदोलन लढ्याला पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे.

सर्व घटकांना समान संधी मिळविण्यासाठी आरक्षण लढा महत्त्वाचा

सध्या मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी आपण माननीय मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहात. आपले हे आंदोलन मराठा समाजाचे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्न उपस्थित करत आहे. या उपोषणामुळे महाराष्ट्रभर मराठा समाजाची मागणी अधिक तीव्रपणे चर्चेत आली आहे.

advertisement

आम्ही बेळगाव येथील मराठा समाजाचे सदस्य, या महत्त्वाच्या आंदोलनाला पूर्णपणे समर्थन देत आहोत. मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक सशक्ततेसाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या आंदोलनामुळे समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळविण्यासाठी एक व्यापक दृष्टीकोन तयार होईल, जे सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहे.

या पत्राद्वारे आम्ही जाहीर करती की, बेळगाव येथील मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आहे. आम्ही राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विनंती करतो की, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक विचार करून लवकरच ठोस निर्णय घेतला जावा, आम्ही यासाठी संघटितपणे आपल्या मागण्यांचा पाठपुराव्यासाठी जरांगे पाटील यांच्या पाठीशी राहू. सरकार या मुद्द्यावर योग्य व समर्पक निर्णय घेईल, अशी आशा आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यातून मराठ्यांचे जत्थेच्या जत्थे मुंबईत, आता जरांगेंचे हात बळकट करण्यासाठी सीमाभागही एकवटला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल