राहुल गांधी नंदुरबारमधील सभेत बोलत होते. देशाला संविधानाच्या माध्यमातून चालवलं पाहिजे. पंतप्रधान मोदी म्हणतात मी संविधानाला पब्लिक मिटिंगमध्ये दाखवतो. संविधान खाली आहे असे म्हणतात. पण संविधान त्यांच्यासाठी खाली आहे.ज्यांनी हे संविधान आयुष्यात कधी वाचलं नाही. तसेच त्यांना या पुस्तकात काय लिहलंय याची कल्पनाच नाही आहे. म्हणून पंतप्रधान मोदींसाठी हे संविधान खाली आहे,असा टोला राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.
advertisement
राहुल गांधी पुढे म्हणाले,ते (पंतप्रधान मोदी) म्हणतात लाल रंगाचे संविधान राहुल गांधी दाखवतात. पण यावर लाल रंग किंवा निळा रंग आहे, याचा आम्हाला फरक पडत नाही. पण या संविधानाच्या आत जे लिहलं आहे,त्याची आम्ही रक्षा करतो आणि त्याच्यासाठी आम्ही जीव द्यायलाही तयार आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.
आज आम्ही बिरसा मुंडा यांच्यासमोर हात जोडले, त्यांच्यासमोर डोकं टेकलं. त्यामुळे मला तुम्हाला विचारायचंय बिरसा मुंडा यांचे विचार याच्यात नाहीयेत,असे देखील राहुल गांधी यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांनी सांगितलं हे संविधान रिकाम आहे. त्यात काहीच नाही.पण मला त्यांना सांगायचंय. नरेंद्र मोदी जी हे संविधान रिकामं नाही आहे. या संविधानात हजारो वर्षाचे विचार, बिरसा मुंडा यांचे विचार,बुद्ध भगवान यांचे विचार, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचे विचार भरलेले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीजी हे संविधान रिकाम नाही आहे. यात संविधानाचा आत्मा आहे. पण जेव्हा तुम्ही याला रिकाम म्हणता,तेव्हा तुम्ही भारत, बिरसा मुंडा, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि महात्मा गांधी यांचा अपमान करताय, असा हल्ला राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर चढवला.त्यामुळे आता लढाई ही संविधान वाचवण्याची आहे,असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
